दैनिक गोमन्तक
सर्व महिलांना मेकअप करणे खूप आवडते, यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप प्रोडक्ट ट्राय करतात, आजकाल महिलांमध्ये ओम्ब्रे ओठांची क्रेज खूप बघायला मिळते.
तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या ओठांना ओम्ब्रे इफेक्ट कसा देऊ शकता, अन् तुम्ही कसे सुंदर दिसू शकाल.
ओम्ब्रे ओठ म्हणजे काय? ओम्ब्रे ओठ लहान किंवा पातळ ओठ असलेल्यांना ओम्ब्रे ओठ इफेक्ट वापरणे आवडते.
ओम्ब्रे ओठ कसे करावे..पहिले लिपपेन्सिलने ओठांची बॉडर करुन घ्या, यासाठी तुम्ही कोणत्याही गडद रंगाची लिप पेन्सिल वापरु शकतात.
त्यानंतर, ओठांची बॉडर आतील बाजूने (ब्लेंडर) मिसळून घ्या. यासाठी तुम्ही लिपस्टिक ब्रशचा वापर शकता.
ओम्ब्रे ओठ नंतर ओठांच्या मध्यभागी न्यूड लिपस्टिक लावा अन् आपल्या बोटांनी दोघं शेड चांगले मिक्स करुन घ्या, तुम्ही ओम्ब्रे लिप्स फिनिशिंगसाठी लिप ग्लॉसचाही वापर करु शकतात.
या स्टेप्स वरच्या अन् खालच्या दोन्ही ओठांवर एकाच वेळी करा, नाहीतर दोन्ही ओठ वेगळे दिसतील. तसेच तुमचा संपूर्ण लुक खराब दिसेल.