Akshata Chhatre
पावसाळा आला की वातावरणात गारवा आणि दमटपणा वाढतो, ज्यामुळे पचनसंस्था थोडी संवेदनशील होते आणि अनेकांना अपचन, गॅस, पोट फुगणे, मळमळ, भूक मंदावणे असे त्रास होऊ लागतात.
पावसाळ्यात पचनसंस्थेचं काम नैसर्गिकरीत्या मंदावतं, त्यामुळे खाल्लेलं अन्न नीट न पचता शरीराला जडपणा आणि थकवा जाणवतो.
जसं की रोज सकाळी एक चमचा जिरे पाण्यात उकळून ते कोमटपणी पिणं, जे पचन सुधारतं आणि गॅस रोखतं; चिमूटभर हिंग गरम पाण्यात टाकून प्यायल्याने अपचन आणि पोट फुगणं कमी होतं.
आले-लिंबूचा चहा पचनसंस्थेला सक्रिय करतो; पुदिन्याचा रस, मध आणि लिंबू मिसळून घेतल्याने पोटाला थंडावा मिळतो.
जेवणानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपचं पाणी पिल्याने गॅसपासून आराम मिळतो आणि पचन सुधारतं.
पावसाळ्यात हे छोटे नैसर्गिक उपाय केल्यास पोट हलकं राहतं, अपचनापासून संरक्षण मिळतं आणि संपूर्ण शरीर ताजेतवाने वाटतं.