Manish Jadhav
इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर बुधवार (11 जून) पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलि यांच्यात ही स्पर्धा खेळली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपली छाप सोडू शकले नाहीत.
मात्र, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडने आपल्या छोट्या खेळीदरम्यान मोठा चमत्कार केला. त्याने रोहित शर्मा आणि कुमार संगकारा सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे सोडले. तो 24 व्या षटकात 11 धावा करुन बाद झाला.
ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हेडने कुमार संगकारा आणि रोहित शर्माला मागे सोडले.
ट्रॅव्हिस हेडने ICC फायनलमध्ये 4 डावात 339 धावा केल्या. आता विराट कोहलीचा विक्रम त्याच्या निशाण्यावर आहे. कोहली हा ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी हेडला 83 धावांची गरज आहे. जर दुसऱ्या डावात हेडच्या बॅटमधून मोठी खेळी आली तर कोहलीचा विक्रम मोडला जाऊ शकतो.