Akshay Nirmale
गुळ बनविण्याची पारंपरिक पद्धत कमी होताना दिसते आहे.
गोव्यातील केपे तालुक्यातील बार्से गावात मात्र गुऱ्हाळघरात गुळ बनवला जातो.
एका प्रचंड मोठ्या कढईत 400 ते 500 लीटर ऊसाचा रस उकळला जातो.
गुळ बनविणे हे कौशल्याचे काम आहे. रस जळणार नाही आणि त्याचा लगदा बनणार नाही याची काळजी घेत हे काम केले जाते.
कढईतील ऊसाचा रस सतत ढवळत राहावे लागते.
या द्रवाला दाणेदार स्वरूप प्राप्त होईपर्यंत ढवळल्यानंतर मातीत पुरलेल्या एका मोठ्या भांड्यात हा द्रव ओतला जातो.
गोव्यात पारंपरिक गुळासह काळ्या रंगाचा गुळही मिळतो.