Kavya Powar
राज्यात वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल सुरू होते.
मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची किनारपट्टी भागात वर्दळ असल्याने दरवर्षी डिसेंबर महिन्यात रस्तेअपघातांचे प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक असते.
पर्यटकांची गर्दी, चालकांचा निष्काळजीपणा व वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघात वाढतात.
ख्रिसमस, सनबर्न, नवीन वर्षाचे स्वागत यासाठी गोव्यात आलेले पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवतात, ज्यामुळे जास्त अपघात होत असल्याचे समोर आले आहे
यावर्षी २०२३ मध्ये नोव्हेंबरपर्यंत २५६८ रस्ते अपघातांची नोंद होऊन २५७ जणांचा बळी गेला आहे.
याकाळात किनारीभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते
राज्यात येणाऱ्या पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळणे अनिवार्य असल्याचे सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे
कारण नेहमीपेक्षा या महिन्यात दुपटीने पर्यटकांची व वाहनांची संख्या वाढते.
त्यामुळे, जर तुम्हीही याकाळात गोव्यात येत असाल, तर वाहतुकीचे नियम पाळा आणि धमाल, मजामस्ती करा