IPL मध्ये सर्वात जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण करणारे संघ

Pranali Kodre

आयपीएल 2023 स्पर्धा सध्या सुरू असून रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.

Lucknow Super Giants | Dainik Gomantak

आयपीएलच्या या 16 व्या हंगामातील 10 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल 213 धावांचे आव्हान अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला.

Nicholas Pooran | Dainik Gomantak

त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये लखनऊने चौथा क्रमांक मिळवला आहे.

Lucknow Super Giants | Dainik Gomantak

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ असून त्यांनी 2020 साली शारजात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध तब्बल 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Rajasthan Royals | Dainik Gomantak

त्यानंतर मुंबई इंडियन्स संघ असून त्यांनी दिल्लीमध्ये खेळताना 2021 साली चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 219 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Mumbai Indians | Dainik Gomantak

या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही राजस्थान रॉयल्स संघ आहे. साल 2008 मध्ये हैदराबादला झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने डेक्कन चार्जसविरुद्ध 215 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Rajasthan Royals | Dainik Gomantak

त्यानंतर चौथ्या क्रमांकवर लखनऊचा क्रमांक लागतो.

Lucknow Super Giants | Dainik Gomantak

तर या यादीत पाचव्या क्रमांकावरही लखनऊचाच संघ असून त्यांनी 2022 साली मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 211 धावांचे लक्ष्य यशस्वी पूर्ण केले होते.

Lucknow Super Giants | Dainik Gomantak
Mitchell Marsh-Greta Mack | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी