Pranali Kodre
आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज मोठमोठे शॉट खेळून जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी प्रयत्नशील असतात.
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 5 खेळाडूंना 130 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करता आली आहे.
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 23 एप्रिल 2013 रोजी नाबाद 175 धावांची खेळी केली होती.
या यादीत त्याच्यापाठोपाठ ब्रेंडन मॅक्युलम असून त्याने आयपीएलच्या पहिल्या वहिल्या सामन्यातच 18 एप्रिल 2008 कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध नाबाद 158 धावांची खेळी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्विंनटॉन डि कॉकने 18 मे 2022 रोजी लखनऊ सुपर जायंट्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाबाद 140 धावांची खेळी केली होती.
या यादीत चौथ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स असून त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 मे 2015 रोजी नाबाद 133 धावांची खेळी केली होती.
या यादीत पाचव्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने पंजाब किंग्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध 24 सप्टेंबर 2020 रोजी नाबाद 132 धावांची खेळी केली होती.
केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची वैयक्तिक धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू आहे.