पहिल्या 9 कसोटी डावात सर्वाधिक धावा करणारे 5 क्रिकेटर

Pranali Kodre

इंग्लंडचा 24 वर्षीय क्रिकेटपटू हॅरी ब्रुकच्या कारकिर्दीची दमदार सुरुवात झाली आहे.

Harry Brook | Dainik Gomantak

ब्रुकने न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत खेळताना 176 चेंडूत 24 चौकार आणि 5 षटकारांसह 186 धावांची खेळी केली.

Harry Brook | Dainik Gomantak

त्याने या खेळी दरम्यानच कसोटी कारकिर्दीत 800 धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे या 800 धावा ब्रुकने केवळ 6 वा कसोटी सामना खेळताना अवघ्या 9 व्या डावात पूर्ण केल्या आहेत.

Harry Brook | Dainik Gomantak

त्यामुळे तो पहिल्या 9 डावात 800 धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. ब्रुकच्या आता 9 डावात 4 शतकांसह 809 धावा झाल्या आहेत.

Harry Brook | Dainik Gomantak

पहिल्या 9 डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. कांबळीने त्याच्या पहिल्या 9 कसोटी डावात 798 धावा केल्या होत्या.

Vinod Kambli | Dainik Gomantak

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हबर्ट सटक्लिफ असून त्यांनी पहिल्या 9 कसोटी डावात 780 धावा केल्या होत्या.

Herbert Sutcliffe | Dainik Gomantak

भारताचे सुनील गावसकर या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी पहिल्या 9 कसोटी डावात 778 धावा केल्या होत्या.

Sunil Gavaskar | Dainik Gomantak

तसेच या यादीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या इव्हर्टन विक्स यांनी पहिल्या 9 कसोटी डावात 777 धावा केल्या होत्या.

Everton Weekes | Dainik Gomantak
Dipika Pallikal and Dinesh Karthik at Hardik Pandya Wedding | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी