Ashutosh Masgaunde
MRF लिमिटेड, म्हणजेच मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड, ₹97,077.35 च्या किमतीसह भारतातील सर्वात महाग स्टॉक आहे. 1990 मध्ये जेव्हा MRF IPO आला तेव्हा शेअरची किंमत ₹11 होती आणि मे 2023 मध्ये त्याने प्रति शेअर ₹1,00,184 चा टप्पा ओलांडला होता.
हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड (HAIL) ची सुरुवात टाटा आणि हनीवेल यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून 1987 मध्ये झाली. ते टाटा हनीवेल लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. 2004 मध्ये, हनीवेल एशिया पॅसिफिक इंकने टाटाचा हिस्सा विकत घेतला आणि त्याचे नाव बदलून हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड करण्यात आले. HAIL शेअरची सध्याची किंमत 41,016.20 इतकी आहे.
कंपनीची स्थापना 1994 मध्ये सुंदर जानोमल आणि त्यांचे भाऊ नरी आणि रमेश यांनी केली होती. त्यांचा एकत्र हिस्सा 54% इतका आहे. पेज इंडस्ट्रीजचा एक शेअर सध्या 39,004.35 रुपयांना आहे.
3M India Limited (3M India) ही विविध क्षेत्रातील वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीचे एकूण मूल्यांकन (बाजार मूल्य) ₹26,301 कोटी आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत आज BSE मार्केटमध्ये ₹ 26,693 आहे.
श्री सिमेंट ही एक भारतीय सिमेंट उत्पादक आहे, ज्याची स्थापना 1979 मध्ये राजस्थानमधील बेवार येथे झाली. आता कोलकाता येथे मुख्यालय असून, ती उत्तर भारतातील सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे. याचा एक शेअर 25,632.00 रुपयाांना आहे.
नेस्ले इंडिया लिमिटेड, स्विस बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय गुडगाव, हरियाणा येथे आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये अन्न, पेये, चॉकलेट आणि कन्फेक्शनरी (नेस्ले इंडियाची उत्पादने) यांचा समावेश आहे. नेस्लेच्या एका शेअर्ची सध्याची किंमत २२,१२५ रुपये आहे.
Abbott India Limited ही फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे एकूण मूल्यांकन (बाजार मूल्य) ₹ 43,044 कोटी आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत ₹20,224.65आहे.