Sameer Amunekar
निसर्गप्रेमींना अत्यंत नयनरम्य आणि शांतीपूर्ण ठिकाणं आवडतात. निसर्गाच्या सौंदर्याने आपल्याला एक वेगळीच शांति मिळते. अशाच काही ठिकाणांची यादी येथे दिली आहेत.
काश्मीर बर्फाच्छादित पर्वत, लहान नद्या या सर्व गोष्टी निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतात. खासकरून डल लेक आणि गुलमर्ग येथील दृश्ये मंत्रमुग्ध करणारी आहेत.
लडाख हे उंच पर्वतीय आणि वाळवंटी प्रदेश असून, येथील नैसर्गिक सौंदर्य खूु सुंदर आहे.
कर्नाटकमधील कूर्ग त्याच्या कॉफी बागांमुळे प्रसिद्ध आहे. येथील डोंगर रांगा, धबधबे आणि घनदाट अरण्यं निसर्गप्रेमींना आकर्षित करतात.
उत्तराखंडमधील नैनीताल हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथील शांत तलाव, हरित डोंगर आणि थंड हवेच्या वातावरणामुळे, या ठिकाणी निसर्गाशी जास्त जवळीक अनुभवता येते.
गोव्यासारख्या समुद्रकिनाऱ्यांच्या सुंदरतेने सजलेले हे ठिकाण शांतीप्रिय आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. येथील सफेद वाळू आणि शांत सागराने पर्यटकांना मोहवले आहे.