Pranali Kodre
नोवाक जोकोविचने 10 सप्टेंबर रोजी अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. जोकोविचसाठी हे कारकिर्दीतील पुरुष एकेरीतील 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.
त्यामुळे जोकोविचने एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
सार्बियाच्या नोवाक जोकोविचने यापूर्वी 11 जून 2023 रोजी फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले होते. त्यावेळीच त्याने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या यादीत राफेल नदालला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता.
स्पेनच्या राफेल नदालनेही त्याच्या कारकिर्दीत एकेरीमध्ये 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या खेळाडूंमध्ये नदाल आणि जोकोविचनंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे.
रॉजर फेडररने 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर पीट सँप्रास असून त्याने 14 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
तसेच पाचव्या क्रमांकावर रॉय इमरसन असून त्याने 12 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.