Pranali Kodre
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात डॉमिनिकाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला.
भारताच्या या विजयात यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे हा त्याचा कसोटी पदार्पणाचा सामना होता.
जयस्वालने या सामन्यात 387 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 171 धावांची खेळी केली.
त्यामुळे जयस्वाल भारताकडून कसोटी पदार्पण करताना तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू ठरला. कसोटी पदार्पणात भारताकडून सर्वोच्च खेळी करणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
शिखर धवन भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू असून त्याने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये पहिल्याच कसोटीत १८७ धावांची खेळी केली होती.
भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वोच्च खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे पहिल्या कसोटीत १७७ धावा केल्या होत्या.
जयस्वालने डॉमिनिका कसोटीत केलेली १७१ धावांची खेळी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वोच्च खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये गुंडप्पा विश्वनाथ चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९६९ मध्ये कानपूरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना १३७ धावा केल्या होत्या
भारताकडून कसोटी पदार्पणात सर्वोच्च खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ पाचव्या क्रमांकावर असून २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट येथे पहिल्या कसोटी सामन्यात १३४ धावांची खेळी केल होती.