Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून या दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी, 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय क्रिकेटपटूंवर नजर टाकू. (आकडेवारी 9 जुलै 2023 पर्यंत)
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 27 सामन्यांत 13 शतकांसह 65.45 च्या सरासरीने 2749 धावा केल्या आहेत.
द्रविडने वेस्ट इंडिजविरुद्ध २३ कसोटी सामने खेळताना 63.80 च्या सरासरीने 5 शतकांसह 1978 धावा केल्या आहेत.
व्हीव्हीएस लक्ष्मणने वेस्ट इंडिजविरुद्ध 22 कसोटी सामन्यांमध्ये 57.16 च्या सरासरीने 4 शतकांसह 1715 धावा केल्या आहेत.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध 21 कसोटी सामन्यांमध्ये 54.33 च्या सरासरीने 1630 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे.
दिपील वेंगसरकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 25 कसोटी सामने खेळताना 44.33 च्या सरासरीने 6 शतकांसह 1596 धावा केल्या आहेत.