Manish Jadhav
ODI वर्ल्ड कप 2023 मध्ये उद्या (14 ऑक्टोबर) भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर दोन्ही संघ एकमेकांना हरवण्यासाठी मैदानात उतरतील. चला तर मग वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया...
सध्या पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 भारतीय फलंदाज पुढीलप्रमाणे...
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सचिनने 5 सामन्यात 78.25 च्या सरासरीने आणि 83.24 च्या स्ट्राईक रेटने 313 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 98 आहे, जी त्याने 2003 मध्ये केली होती.
विराटने पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांत 64.33 च्या सरासरीने आणि 91.03 च्या स्ट्राईक रेटने 193 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 107 आहे. त्याला सचिनला मागे सोडण्याची संधी आहे.
वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या 2 सामन्यात 77.50 च्या सरासरीने आणि 116.54 च्या स्ट्राईक रेटने 155 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 140 आहे, जी त्याने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सामन्यात केली होती.
मोहम्मद अझरुद्दीन हा त्याच्या पिढीतील सर्वात स्टायलिश फलंदाज होता. अझरुद्दीनने ODI वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यात 39.33 च्या सरासरीने आणि 80.27 च्या स्ट्राईक रेटने 118 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 59 आहे.
सुरेश रैनाने नंबर 5 वर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 110 धावा केल्या होत्या.