Pranali Kodre
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात बे ओव्हल, माउंट मौनगानुई येथे पहिला कसोटी सामना झाला.
या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
त्याच्या नावावर आता 90 कसोटी सामन्यात 109 षटकार नोंदवले गेले आहेत.
स्टोक्सने हा विश्वविक्रम करताना न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमच्या 107 कसोटी षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले.
मॅक्यूलमने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 101 कसोटी सामने खेळताना 107 षटकार मारले होते.
कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऍडम गिलख्रिस्ट असून त्याने 100 षटकार मारले आहेत.
आत्तापर्यंत स्टोक्स, मॅक्यूलम आणि गिलख्रिस्ट या तिघांनाच कसोटीत 100 षटकारांचा टप्पा गाठता आला आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत 98 षटकारांसह ख्रिस गेल चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीत जॅक कॅलिस पाचव्या क्रमांकावर असून त्याने 97 षटकार मारले आहेत.