Akshata Chhatre
आपल्याकडे सोने खरेदीला प्रचंड प्रतिसाद दिला जातो. खास करून लग्नसमारंभाच्या काळात सोन्याची खरेदी वाढत मात्र तुम्ही कधी विचार केला का भारतात सोन्याचे दर इतके जास्त का आहेत आणि जगात सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते?
जागतिक बाजारातील दराव्यतिरिक्त, भारतातील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण आहे सरकारी कर आणि आयात शुल्क आहेत.
भारतात सोन्यावर सुमारे १५% आयात शुल्क आणि ३% जीएसटी आकारला जातो, ज्यामुळे अंतिम किंमत खूप वाढते.
अनेक देशांमध्ये, विशेषतः दुबईसारख्या ठिकाणी, सोन्यावर कमी कर किंवा आयात शुल्क नसते. काही ठिकाणी गुंतवणूक-श्रेणीचे सोने तर करमुक्त असते. त्यामुळे, या देशांमध्ये सोन्याचा दर जागतिक स्पॉट रेटच्या जवळ असतो.
अनेकजण सोने खरेदीसाठी दुबईला जातात, पण जगातील अनेक देशांत सोने भारतापेक्षा खूप स्वस्त मिळते. हॉंगकॉंग, स्वित्झर्लंड, सिंगापूर, अमेरिका आणि तुर्की या देशांमध्ये सोन्याचे दर कमी आहेत.
तुम्ही परदेशातून स्वस्त सोने खरेदी केले तरी, भारतात परतताना तुम्हाला सीमा शुल्क भरावे लागते. मोठ्या प्रमाणात सोने आणल्यास ते जप्त देखील होऊ शकते.
सोने खरेदी करताना केवळ आजचा दर नव्हे, तर त्याची शुद्धता, मेकिंग चार्जेस आणि कर नियम यांची माहिती असणे आवश्यक आहे. परदेशातून खरेदी करताना सीमा शुल्क आणि कायदेशीर मर्यादा नेहमी लक्षात ठेवा.