Pranali Kodre
साल 2021 ते 2023 या दोन वर्षांच्या कालावधीत कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धचे दुसरे पर्व खेळवण्यात आले. या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाने गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 7 ते 11 जूनदरम्यान द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत करत विजेतेपद जिंकले.
दरम्यान या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातही अनेक गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 20 सामने खेळताना सर्वाधिक 88 विकेट्स घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 13 सामने खेळताना 67 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा दिग्गज अष्टपैलू आर अश्विनने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 13 सामन्यांमध्ये 61 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 15 सामन्यांमध्ये 58 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 16 सामन्यांमध्ये 57 विकेट्स घेतल्या आहेत.