Pranali Kodre
क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजासाठी निर्धाव षटक (मिडन ओव्हर) टाकणे महत्त्वाचे असते, पण तितकेच कठीणही.
त्यातही टी20 क्रिकेटमध्ये एकही धाव न देता षटकातील सर्व चेंडू टाकणे खूप कठीण मानले जाते, पण असे काही क्रिकेटपटू आहे, ज्यांनी अशी कामगिरी अनेकदा करून दाखवली आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांबद्दल आपण जाणून घेऊ.
आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम प्रविण कुमारच्या नावावर असून त्याने 14 षटके निर्धाव टाकली आहेत.
त्याच्यानंतर भुवनेश्वर कुमारचे नाव येते. त्याने 11 षटके आयपीएलमध्ये निर्धाव टाकली आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इरफान पठाण असून त्याने 10 षटके आयपीएलमध्ये निर्धाव टाकली आहेत.
ट्रेंट बोल्ट या यादीत 9 निर्धाव षटकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
जसप्रीत बुमराह या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 8 षटके निर्धाव टाकली आहेत.
केवळ बुमराहच नाही, तर लसिथ मलिंगा, धवल कुलकर्णी आणि संदीप शर्मा यांनीही आयपीएलमध्ये 8 षटके निर्धाव टाकली आहेत.