Pranali Kodre
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 7 ते 11 जूनदरम्यान द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत करत विजेतेपद जिंकले.
2021 ते 2023 या दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धच्या दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाने गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा करत अंतिम सामन्यात स्थान मिळवला होता.
दरम्यान या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातही अनेक फलंदाजांनी काही शानदार खेळी केल्या. त्यामुळे या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत 22 सामने खेळताना सर्वाधिक 1915 धावा केल्या. यात त्याच्या 8 शतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये 17 सामन्यांमध्ये 6 शतकांसह 1621 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅब्युशेनने चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये 20 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 1576 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये 14 सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1527 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने चॅम्पियनशीप 2021-23 मध्ये 20 सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1407 धावा केल्या आहेत.