Kavya Powar
सध्या सगळीकडेच टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत.
गोव्यातही 15 ते 20 रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या टोमॅटोने आपला ‘रंग’ दाखवायला सुरूवात केली आहे
गोव्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून मागणी मात्र वाढली आहे
बाजारात लहान टोमॅटो 60 रुपये तर मोठे टोमॅटो 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत
परराज्यांतून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने त्याचे भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेजारच्या राज्यांत जास्त पाऊस पडल्याने टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झालाय.
टोमॅटोचे पीक नष्ट झाल्याने दरावर परिणाम झाला आहे