Ashutosh Masgaunde
गातील सर्वात प्रसिद्ध जहाज टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी निघालेली पर्यटकांची पाणबुडी रविवारपासून बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.
पाणबुडीवरील पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, फ्रेंच एक्सप्लोरर पॉल हेन्री नार्गेलेट आणि स्टॉकटन रश यांचा समावेश आहे.
प्रवास सुरू करण्यापूर्वी, हर्मिश हार्डिंगने सोशल मीडियावर लिहिले की, टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत जाणाऱ्या मोहिमेचा एक भाग असल्याचे जाहीर करताना मला अभिमान वाटतो.
आठ दिवसांच्या या प्रवासासाठी अडीच लाख डॉलर्स म्हणजेच दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची तिकिटे खरेदी करावी लागतात.
या प्रवासात पर्यटकांना टायटॅनिकचे अवशेष समुद्रात 3800 मीटर खाली जाऊन पाहता येतात.
या बेपत्ता पाणबुडीचे वजन 10 हजार 432 किलो असून वेबसाइटनुसार ती 13 हजार 100 फूट खोलीपर्यंत जाऊ शकते. पाणबुडीमध्ये 96 तास ऑक्सिजनचा सपोर्ट असतो.
1912 मध्ये ब्रिटनहून अमेरिकेला जाणारे टायटॅनिक हे जहाज वाटेत एका हिमखंडाला धडकले. या जहाजावर 2200 लोक होते, त्यापैकी सुमारे 1500 जणांचा मृत्यू झाला होता