Akshata Chhatre
याच दिवशी, १९४७ साली संविधान सभेने तिरंगा ध्वजाला भारताच्या अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारले.
म्हणूनच हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.
तिरंग्याचे रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे अनुक्रमे शौर्य व त्याग, शांती व सत्य, आणि समृद्धीचे प्रतीक आहेत.
पांढऱ्या पट्ट्यामध्ये असलेले अशोकचक्र हे गती आणि प्रगतीचे द्योतक आहे.
या दिवशी विविध शाळा, संस्था आणि समाजात तिरंग्याचे महत्त्व पटवून दिले जाते.
आणि लोकांमध्ये देशभक्ती जागवली जाते.