Akshata Chhatre
जर तुमच्या मुलाची उंची त्याच्या वयानुसार वाढत नसेल, तर तुमच्या दैनंदिन सवयी आणि मुलाच्या जीवनशैलीत काही चुका होत आहेत का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास मुलाची केवळ उंचीच नाही, तर एकूण वाढही योग्य प्रमाणात होऊ शकते.
अनेक पालकांना वाटतं की फक्त चांगलं खाऊ घातलं की मुलाची वाढ होईल, पण वास्तविक वाढीसाठी झोप, शारीरिक हालचाल, योग्य आहार आणि हार्मोनल संतुलन सुद्धा तितकेच गरजेचे असतात.
अनेक मुलांचं झोपेचं वेळापत्रक खूपच अस्वास्थ्यकारक असतं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहणे आणि सकाळी लवकर शाळेत जाणे, त्यामुळे त्यांना फक्त ५–६ तास झोप मिळते.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक हालचाल. मुलं जर दिवसभर घरात बसून राहिली, तर त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होतो.
मुलांना प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम समृद्ध आहार दिल्यास हाडे मजबूत होतात आणि ग्रोथ हार्मोनचा स्राव सुरळीत होतो
ग्रोथ हार्मोन, इन्सुलिन आणि थायरॉईड हार्मोन योग्य प्रमाणात कार्यरत राहिल्यासच मुलाची उंची आणि शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होते.