दैनिक गोमन्तक
आपली नाती , कुटुंब टिकण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करत राहणे महत्वाचे असते
आपल्या कुटुंबावर व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करत राहा.
एकमेकांनी केलेल्या चांगल्या कामाची वेळोवेळी स्तुती करा. त्यामुळे समोरच्या माणसाला छान वाटते.
एखाद्या व्यक्तीकडून काही चुकत असेल, तर ती गोष्ट त्याला शांततेत समजून सांगा. त्यामुळे गैरसमज होणार नाहीत
जसं आपण आनंदात सहभागी होतो, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगात एकमेकांची काळजी घ्यावी, साथ द्या.
एकमेकांचा आदर करा, कारण आपल्या कुटुंबापेक्षा इतर कोणीही महत्त्वाचं नाही.
महत्वाच्या निर्णयात विश्वासात घ्या. विश्वास टिकून राहिला तर नाती टिकण्यास मदत होते.