दैनिक गोमन्तक
आता अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी प्लॅनिंग करत असतात
हा प्रवास सुखकर होण्यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे असते.
प्रवासात खाण्यासाठी राजगिऱ्याचे लाडू किंवा पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू , भोपळ्याचे घारगे, थेपले, शेंगदाणा पोळी, बेसन पोळी ,शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी सोबत स्थानिक ब्रेडचे सॅंडविच, चुरमुरे, फुटाणे, लाह्या यांचा वापर यांचा वापर करून भेळ बनवून खाऊ शकतो.
ताक, नारळाचे पाणी, कोकम सरबत, शिकंजी यासारखी पेये निवडावीत. जेणेकरून साईटसीइंग करताना होणारे डिहाड्रेशन टळेल.
हॉटेलमधील सॅलड्स न मागवता जवळच्या भाजी मंडईमधून काकडी-गाजर, बीट यांसारख्या भाज्या घेऊन त्यांचे सेवन करावे.
जेवण निवडताना बेक्ड, तंदूर, रोस्टेड, वाफवलेले निवडू शकतो.बराच वेळ बसून प्रवास असल्यास जमेल तेव्हा चाला.
रूममध्ये गेल्यावर स्ट्रेचिंग व योगासने करावी- ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होईल. भरपूर पाणी प्यावे.