गोमन्तक डिजिटल टीम
मायक्रोवेव्ह असल्यामुळे आपल्याला अन्न गरम करणे आणि विविध पदार्थ तयार करणे खूप सोपे होते.
अन्न गरम केल्यानंतर आणि शिजवल्यानंतर अनेक वेळा अन्न किंवा घाण त्यात तसेच राहते.
लोक ते सहज वापरतात पण जेव्हा ते स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना ते खूप अवघड जाते.
आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मायक्रोवेव्ह स्वच्छ करू शकता.
बेकिंग सोडा आणि त्यात पाणी टाकून घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर ते पेस्ट मायक्रोवेव्हमध्ये लावून थोडा वेळ थांबावे त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्या .
मायक्रोवेव्हच्या आत पेपर टॉवेल ठेवून ते 30 ते 50 सेकंद मशीन ऑन करून ठेवा. जेणेकरून त्यात वाफ तयार होईल आणि घाण वास जाईल.
लिंबाचे कापलेले तुकडे आणि पाणी एका वाटीत घ्या. आणि ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. 2 ते 4 मिनिटांसाठी मशीन चालू करा. त्यांनातर त्यात वाफ तयार होईल. नंतर कापडाने पुसून घ्या.
एका सुरक्षित भांड्यात डिश साबण ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये वाफ येईपर्यंत त्याला ठेवा त्यानंतर स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा घ्या.