गोमंतक ऑनलाईन टीम
IT क्षेत्रातील दिग्गज मानली जात असलेली इन्फोसिस ही एकमेव भारतीय कंपनी या टॉप-100 मध्ये आहे.
टाईम आणि स्टॅटिस्टाने तयार केलेल्या 'वर्ल्ड बेस्ट कंपनी 2023' च्या टॉप-4 यादीमध्ये असलेल्या सर्व कंपन्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आहेत आणि त्या अमेरिकेतील आहेत.
मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अल्फाबेट, मेटा, अॅक्सेंचर, पीफायजर, अमेरिकन एक्सप्रेस, Electricite de France, बीएमडब्ल्यू, डेल
बंगळुरूस्थित इन्फोसिस 88.38 च्या एकूण गुणांसह या यादीत 750 जागतिक कंपन्यांमध्ये 64 व्या स्थानावर आहे.
1981 मध्ये स्थापन झालेल्या Infosys मध्ये 3,36,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
इन्फोसिस ही केवळ टॉप-100 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी नाही, तर ती यादीतील टॉप-3 जागतिक व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
कर्मचार्यांचे समाधान, महसूल वाढ, शाश्वतता आणि पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स (ESG) या निकषांवरून ही निवड केली गेली.