वाघ, सिंह बिबट्या या बिग कॅट्सबद्दल या गोष्टी जाणून घ्या...

Rahul sadolikar

सिंह (Lion)

सिंह हा सगळ्यात मोठा बिग कॅट समजला जातो. कॅट फॅमिलीमधला सिंह हा प्राणी त्याची आयाळ आणि गर्जनेसाठी ओळखला जातो. प्रौढ सिंहाची गर्जना पाच मैल दूरपर्यंत ऐकू येते. गिर राष्ट्रीय उद्यान हे सिंहाच्या संवर्धनासाठी काम करतं

Lion | Dainik Gomantak

वाघ (Tiger)

वाघ हा उत्तम शिकारी समजला जातो. पट्टेरी वाघाची प्रजाती भारतात धोक्यात होती पण आता ही संख्या स्थिर आहे. वाघाचे पट्टे फिंगरप्रिंटसारखे असतात. पट्ट्यांचे कोणतेही दोन नमुने अगदी सारखे नसतात.

Tiger | Dainik Gomantak

जग्वार (Jaguar)

बिग कॅट्समध्ये जग्वार देखील येतो. जग्वारचे जबडे उघडे कासवाचे कवच फोडण्याइतके मजबूत असतात

Jaguar | Dainik Gomantak

बिबट्या (Leopard)

बिबट्या त्यांच्या भक्ष्याला उंच झाडावर चढून लपवतो. झाडावर चढण्याची कला बिबट्यामध्ये निसर्गाने चांगलीच विकसित केली आहे.

Leopard | Dainik Gomantak

पँथर (Panther)

पट्टेरी बिग कॅट्समध्ये एक काळाकुट्ट प्राणीही आहे हे तुम्हाला माहितेय का? बरोबर ब्लॅक पँथर. वास्तविक पँथर हा बिबट्याच आहे ;पण गुणसुत्रांतील गुंतागुंतींमुळे त्याचा रंग काळा होतो.

Panather | Dainik Gomantak

हिम बिबट्या ( स्नो लेपर्ड )

हिम बिबटे म्हणजेच स्नो लेपर्ड ५० फूटांपर्यंत झेप घेऊ शकतात. हे दिसायला अतीशय देखणे असतात. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतराजींमध्ये आढळते.

Snow Leopard | Dainik Gomantak

क्लाऊडेड लेपर्ड (Clouded Leopard)

बिग कॅट्समधली ही प्रजाती उत्कृष्ट गिर्यारोहक समजली जाते. हिमालयाच्या पायथ्यापासून ईशान्य भारत आणि भूतानच्या मुख्य भूमीपासून दक्षिणपूर्व आशियापर्यंत दक्षिण चीनमध्ये घनदाट जंगलात ही प्रजाती आढळते.

Clouded Leopard | Dainik Gomantak

हत्ती शिकवतात जगण्याची मूल्ये

Elephant | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी