Rahul sadolikar
गोव्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचं योगदान देणाऱ्या तियात्रचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे.
गोवन तियात्रचा जन्म जवळपास 119 वर्षांपूर्वी म्हणजे 1892 मध्ये मुंबईत झाला.
बार्देश तालुक्यातील सकलवाडा, आसगाव येथील लुकाझिन्हो रिबेरो नावाच्या तरुणाला तियात्रला गोव्यात आणणारा कलाकार म्हणून ओळखले जाते ;कारण त्याने जोआओ अगोस्टिनहो फर्नांडिस आणि इतरांसमवेत तियात्रचा पहिला प्रयोग केला होता.
17 एप्रिल 1892 रोजी इस्टरच्या निमित्ताने तियात्र परफॉर्मन्स पहिला प्रयोग सादर झाला. या तियात्रचे नाव "इटालियन बुर्गो" होते. हे तियात्र लुकाझिन्हो रिबेरो यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले होते म्हणून तो या अनोख्या नाट्यमय प्रकाराचं श्रेय त्यांनाच जातं.
जोआओ अगोस्टिनहो फर्नांडिस हे , सासष्टी येथील आहेत ज्यांनी असंख्य तियात्र लिहिल्या आणि दिग्दर्शित केल्या. तियात्र नाट्यप्रकाराला गोव्यात लोकाश्रय मिळवून दिला. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी तियात्र हस्तलिखिते पुस्तकरूपात प्रकाशित केली होती.
तियात्रचा जन्म होण्यापूर्वी गोव्यातील लोकांचे मनोरंजन झागोर आणि खेल या लोकनाट्यांद्वारे केले जात असे.
झागोर हे गोव्याच्या उत्तरेला लोकप्रिय होते तर खेल, ज्याला फेल म्हणूनही ओळखले जात होते, ते गोव्याच्या दक्षिणेत लोकप्रिय होते.