दैनिक गोमन्तक
थायरॉईडच्या पेशंटसाठी आरोग्यवर्धक चहा बनवण्याची खास रेसिपी आपण बघुयात.
त्यासाठी 1 ग्लास पाणी, 2 चमचे धने, 9-10 कडिपत्ता पाने, 5-6 सुकलेल्या गुलाब पाकळ्या हे साहित्य लागेल.
एक भांड्यात ग्लासभर पाणी घ्या.
त्यात धने, कडिपत्ता, गुलाब पाकळ्या हे सर्व टाका.
मंद आचेवर 5-7 मिनिट हे उकळु द्या.
हा चहा सकाळच्या वेळी घेणे उत्तम.
सकाळी कॅफिनचे सेवन केल्यामुळे थायरॉईड पेशंटला जास्त त्रास होतो,
तर साधा चहा, कॉफी टाळुन तुमच्यासाठी हा चहा उत्तम पर्याय आहे.