Akshay Nirmale
15 आणि 16 एप्रिल रोजी गोव्यातील पहिलाच काजू महोत्सव कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणार आहे.c
देशातील इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचा महोत्सव यापुर्वी झाला आहे, पण गोव्यात असा महोत्सव प्रथमच होत आहे.
काजुच्या इकॉनॉमीने राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
काजूचा वारसा जगासमोर आणणे आणि काजू उद्योगाबाबत मंथन करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.
गोव्यात पिकणारे विविध प्रजातींचे काजू या महोत्सवात पाहायला मिळतील. काजू फेणीची परंपराही समजून घेता येईल.
या महोत्सवात काजूविषयी कार्यशाळा, व्याख्याने, काजू उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री, फॅशन शो, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
काजूबिया, काजूगर, काजूफळाची भाजी, निरा, काजू फेणी, हुर्राक अशी खाद्यसंस्कृती येथे काजू या एका फळामुळे तयार झाली आहे.