Akshay Nirmale
गोव्यातील शिरगावात लईराई जत्रोत्सवाला 24 एप्रिलपासून सुरवात झाली आहे. या शिरगावात काही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पाळल्या जात आहेत.
या जत्रोत्सवात धोंड हे भक्तगण घरापासून लांब राहतात. त्यांनी छताखाली राहू नये, असा संकेत आहे.
कोंबडी ही खूप घाण करते. इतस्ततः तिची विष्ठा पडलेली असती. तीचा स्पर्श या धोंडांना होता कामा नये, असा संकेत आहे.
त्यामुळेच या गावात कोंबडीच पाळली जात नाही. यासह इतरही काही परंपरा पाळल्या जातात.
हे धोंड या जत्रोत्सवापुर्वी घराबाहेर राहायला जातात. ते छताखाली राहत नाहीत. ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत.
जत्रोत्सवात हे धोंड भक्तगण जळत्या निखाऱ्यांवरून पळतात. जर वरील परंपरा पाळल्या नाहीत तर धोंड भक्तगणांना निखाऱ्यांचे चटके बसतात, अशी श्रद्धा आहे.
त्यामुळेच या गावात कोंबडी न पाळण्यासह विविध प्रथा, परंपरांचे येथे पालन वर्षानुवर्षे केले जात आहे. दरम्यान, शिरगावसह इतरही अनेक गावांमध्ये धोंड या विविध व्रतांचे पालन करत असतात.