चोप्रा, जोहर खूप मागे... 12,800 कोटींच्या संपत्तीसह 'हा' आहे सर्वात श्रीमंत भारतीय चित्रपट निर्माता

Akshay Nirmale

तगडी कमाई

चित्रपट निर्माते (फिल्म प्रोड्युसर) हे चित्रपट बनविण्यासाठी पैसे लावत असतात. त्यातून ते मोठी कमाईदेखील करतात. यात थिएटरच्या कमाईसह सॅटेलाईट, डिजिटल हक्कांचाही समावेश असतो.

Ronnie Screwvala | google image

बडे स्टुडियो, निर्माते

या कमाईमुळे चित्रपट निर्माते श्रीमंत असतात. भारतातही बडे स्टुडियोज आणि चोप्रा, जोहर असे श्रीमंत चित्रपट निर्माते आहेत. पण सर्वात श्रीमंत निर्मात्याचे नाव वाचून आश्चर्य वाटू शकते.

Karan Johar | Instagram

रॉनी स्क्रुवाला

रॉनी स्क्रुवाला (Ronnie Screwvala) हे भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माते आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.55 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजेच सुमारे 12,800 कोटी रूपये.

Ronnie Screwvala | google image

कोण आहेत रॉनी स्क्रुवाला?

रॉनी स्क्रूवाला हे यूटीव्हीचे संस्थापक आणि आरएसव्हीपी मूव्हीजचे प्रमुख आहेत. स्क्रुवाला यांनी 70 च्या दशकात टूथब्रश उद्योजक म्हणून सुरुवात केली होती.

Ronnie Screwvala | google image

युटीव्ही

1981 मध्ये केबल टीव्ही उद्योग सुरू केला. 1990 मध्ये त्यांनी UTV ची स्थापना केली. 2012 मध्ये, त्याने कंपनीतील आपला हिस्सा एक अब्ज डॉलर्सना डिस्नी कंपनीला विकला.

Ronnie Screwvala | google image

इतर गुंतवणूक

2014 मध्ये, स्क्रूवाला यांनी RSVP Movies ची स्थापना केली. याद्वारे त्यांनी उरी आणि केदारनाथ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय UpGrad, Usports, Unliazer मध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

Ronnie Screwvala | google image

इतर निर्माते खूप मागे

करण जोहर, आदित्य चोप्रा, भूषण कुमार किंवा अगदी एकता कपूर यांसारख्या मोठ्या स्टुडिओचे प्रमुख असणारे निर्माते संपत्तीच्या तुलनेत रॉनी स्क्रुवाला यांच्यापेक्षा खूप खाली आहेत.

Ronnie Screwvala | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...