Akshata Chhatre
तुमचं नातं तुम्हाला आनंद देतंय की तुम्ही त्याला फक्त ओढत आहात? अनेकदा लोकांना वाटतं की, नात्यात थोडीफार तडजोड करणे सामान्य आहे.
कोणत्याही नात्यात आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुमचा जोडीदार तुम्हाला वारंवार कमी लेखत असेल, तुमची थट्टा करत असेल किंवा तुमच्या भावनांची कदर करत नसेल, तर ही धोक्याची घंटा आहे.
तुमचा जोडीदार तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देत नाही का? किंवा ती स्वप्ने सोडून देण्यास सांगतो का? एक खरा साथीदार तोच असतो जो तुमच्या स्वप्नांना पंख देतो, त्यांना दाबून टाकत नाही.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात काही प्रमाणात स्पेसची गरज असते.तर हे नात्यासाठी योग्य नाही. प्रेमाचा अर्थ पिंजरा नाही, तर एकमेकांना उंच भरारी घेण्याचे स्वातंत्र्य देणे आहे.
तुमची आणि तुमच्या जोडीदाराची आवड-नापसंत प्रत्येक बाबतीत सारखीच असेल असे नाही. पण जर तो/ती तुमच्या आवडीला कमी लेखत असेल किंवा तुमच्यावर आपली आवड लादण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे नात्यातील समानतेच्या अभावाचे लक्षण आहे.
जर तुम्ही तुमच्या नात्यात सतत दुःखी, अस्वस्थ किंवा तणावात राहत असाल, तर हे नाते तुमच्यासाठी योग्य आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
कोणत्याही नात्याचा उद्देश तुम्हाला आनंद आणि मानसिक शांती देणे असतो, तणाव नाही. आपल्या सुखाशी आणि मनःशांतीशी तडजोड करणे सर्वात मोठे नुकसान आहे.