Akshata Chhatre
लग्नापूर्वी व नंतर मुलीला तिच्या सासरी कसे वागावे याबद्दल पालकांकडून अनेक सूचना दिल्या जातात.
मुलीने अॅडजस्टमेंट करणे ही गरज खरी असली, तरी अॅडजस्टमेंटच्या नावाखाली तिच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती मोठी समस्या ठरते.
अनेकदा सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात रमून राहणे, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव पेलणे या गोष्टी कोणत्याही मुलीसाठी वेदनादायक ठरतात.
तिच्या सासरी काय चालले आहे, याबद्दल पालकांना जाणून घेण्याची इच्छा नसते, कारण अजूनही समाजात “मुलगी म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता” ही मानसिकता दृढ आहे.
लग्नानंतर नवरा मदत करतो म्हटले की “तू नशीबवान आहेस” असे ऐकायला मिळते, पण खरं तर हे भाग्य नव्हे, तर नातेसंबंधातील समता आहे.
अशा वेळी सुशिक्षित व करिअरकेंद्रित मुलीच्या भावना व स्वप्नांचा विचार केला जात नाही.
म्हणूनच समाज बदलला तरीही मुलींच्या नजरेत पालकांनी दिलेल्या अशा अनेक सूचना आजही अप्रिय वाटतात.