दैनिक गोमन्तक
काही आजार अनुवंशिकतेनेदेखील होतात.
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा ती कोणत्या मानसिक अवस्थेतून जात असते त्याचा परिणाम बाळाच्या मानसिक आरोग्यावरदेखील होतो. याबरोबरच, जर ती व्यसन करत असेल तरीदेखील त्याचा परिणामदेखील बाळावर होतो.
आपल्या शरिरातील हार्मोन्स असंतुलित झाले तरीदेखील त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
घरातील वातावरण खराब असेल. सतत वाद-भांडण होत असतील त्याचा परिणाम देखील त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
बालपणी कोणतेही भयंकर आघात-अपघाताचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
कोणत्याही प्रकारचे शोषण यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतात.
जात, पंथ, लिंग यामुळे जर तुम्हाला कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागले असेल तरीदेखील त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.