Kavya Powar
सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.
याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि अनेक आजार शरीरापासून दूर राहतात.
परंतु जास्त प्रमाणात किंवा विशिष्ट परिस्थितीत सफरचंद खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते.
काही लोकांना फळांची ऍलर्जी असते तर काहीजण फळांच्या परागकणांच्या संपर्कात येऊन आजारी पडतात. याला पोलन ऍलर्जी म्हणतात.
सफरचंदाच्या अतिसेवनामुळे या ऍलर्जीचा त्रास लोकांना होतो. पोलन ऍलर्जीचे मुख्य कारण म्हणजे काही फळांचे परागकण, ज्याच्या संपर्कात आल्यावर एखादी व्यक्ती आजारी पडते.
सफरचंद हे देखील या फळांपैकी एक आहे. पोलन ऍलर्जीमध्ये तोंड आणि चेहरा सुजतो.
सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर एक किंवा दोन तासांनी शरीरावर अनेक लक्षणे दिसू लागतात.