Kavya Powar
रिकाम्या पोटी व्यायाम करणे सामान्यतः निरोगी लोकांसाठी सुरक्षित असू शकते
मात्र काही लोकांना यामुळे समस्या असू शकतात. काही लोकांना जेवल्याशिवाय जास्त वेळ व्यायाम करण्याची ऊर्जा मिळू शकत नाही.
यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते. जर तुम्हाला रिकाम्या पोटी योगा किंवा व्यायाम करताना अस्वस्थ वाटत असेल किंवा बरे वाटत नसेल, तर तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी काही वेळ हलका नाश्ता करू शकता.
जर तुम्ही रिकाम्या पोटी वर्कआऊट करण्याचा विचार करत असाल तर जास्त दाबाचे व्यायाम करू नका.
वेगवान चालणे, हलके जॉगिंग किंवा योगासने तुम्ही करू शकता
डॉक्टर म्हणतात, 'अनेक लोक सुरक्षितपणे रिकाम्या पोटी व्यायाम करू शकतात. काही लोकांना व्यायामापूर्वी हलके जेवण किंवा नाश्ता केल्याने फायदा होऊ शकतो.
ज्याना काही आजार असतील त्यांनी चुकूनही रिकाम्या पोटी व्यायाम करू नये