गोमन्तक डिजिटल टीम
वाळलेल्या बदामामध्ये अशा अनेक फायदेशीर पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते, जे अनेक लोकांचे शरीर पचवू शकत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी सुक्या बदामाचे सेवन करणे टाळले पाहिजे.
सुक्या बदामामध्ये जास्त कॅलरी आणि तेल असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सुके बदाम प्रमाणात सेवन करावे.
काही लोकांना बदामाची ऍलर्जी असू शकते, जसे की त्वचेवर खाज सुटणे अशा अडचण येतात. अशा वेळी बदाम खाऊ नका आणि अॅलर्जीची लक्षणे टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांनी बदामाचे सेवन केल्याने पित्ताशयातील समस्या वाढू शकते. अशा लोकांनी बदामाचे सेवन टाळा आणि याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांना उलट्या, अपचन, पोटदुखी, यासारख्या पोटाच्या समस्या सुक्या बदामाच्या सेवनाने वाढू शकतात. अशा वेळी सुक्या बदामाचे सेवन करणे टाळावे.
काही लोकांना खूप जास्त बदाम खाल्ल्याने नशा होऊ शकतो. विशेषतः जेव्हा ते जास्त प्रमाणात खाल्ले असतील. त्यामुळे अशा लोकांनी सुक्या बदामाचे सेवन कमी करावे किंवा पूर्णपणे टाळावे.
म्हणूनच अनेकांनी कोरडे बदाम खाणे टाळावे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.