गोमन्तक डिजिटल टीम
बदाम, अक्रोड आणि पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स असतात. शिवाय हे पदार्थ व्हिटॅमिन्स, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात.
तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यासोबतच फॉलेट, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं.
कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीही अतिशय उपयुक्त ठरते. त्यातही व्हिटॅमिन सी, के तसेच लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं.
आल्यामध्ये असणारे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
लसूणला देखील हार्ट फ्रेंडली फूड म्हणून ओळखलं जातं. कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज थोडा तरी लसूण आहारात असायलाच हवा.
भेंडीमध्ये आढळणारा जाड जेलसारखा पदार्थ हा कोलेस्ट्रॉल शरीरीतून काढून टाकण्यासाठी मदत करतो.
सफरचंद आणि द्राक्षे यासारख्या फळांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो. कारण या फळांमध्ये पेक्टीन चा मुबलक प्रमाणात सामावेश असतो.