Akshay Nirmale
लुसैल स्टेडियम
या स्टेडियमचे बांधकाम उजेड आणि सावली या संकल्पनेनुसार झाले आहे. याची आसनक्षमता 80,000 आहे. येथेच 18 डिसेंबरला फायनल मॅच होईल.
एज्युकेशन सिटी स्टेडियम
अल् रय्यान येथील या स्टेडियमचा दर्शनी भाग त्रिकोणीय असून हिऱ्याच्या आकाराचा आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 45,350 आहे.
अहमद बिन अली स्टेडियम
कतारचे अमीर अहमद बिन अली अल थानी यांचे नाव स्टेडियमला दिले आहे. आसनक्षमता 44,740 एकूण 7 लढती येथे होतील.
अल जानौब स्टेडियम
पारंपरिक गलबतापासून प्रेरणा घेऊन या स्टेडियमचे बांधकाम केले आहे. एकूण 7 सामने येथे होतील. आसनक्षमता 40,000आहे.
अल बय्त स्टेडियम
अल खोर या किनारपट्टीवरील शहरात भटक्या लोकांसाठीच्या बय्त अल शार या तंबूंवरुन स्टेडियमचे नामकरण झाले आहे. 9 सामने येथे होतील. आसनक्षमता 60,000 आहे.
खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम
या स्टेडियमवर स्पर्धेतील आठ सामने होतील. एकूण आसनक्षमता 45,416आहे.
खलिफा स्टेडियम 1976 साली बांधण्यात आले.
अल थुमामा स्टेडियम
पुरुष परिधान करत असलेल्या गाफिया या विणलेल्या टोपीप्रमाणे स्टेडियमचा आराखडा आहे. एकूण आठ सामने येथे होतील. आसनक्षमता 40,000 आहे. याशिवाय 974 शिपिंग कंटेनर्सच्या वापर करून उभारलेल्या स्टेडियमध्ये सात सामने होतील. हे स्टेडियम 40,000 आसनक्षमतेचे आहे.