Shreya Dewalkar
पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाचा आजार मानला जात होता, मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात 25 ते 30 वर्षे वयाच्या व्यक्तींनाही हृदयविकाराचा त्रास होत आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे मानसिक ताण आणि खाण्याच्या अनियमित सवयी. भारतात हृदयरोगी झपाट्याने वाढू लागले आहेत.
25 ते 30 वयोगटातील तरुणही या आजाराला बळी पडत आहेत. नवीनतम प्रकरणांमध्ये, प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण 30 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे.
याची अनेक कारणे आहेत. तरुणांची चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अति ताणतणाव, धूम्रपान, प्रदूषण, कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाच्या समस्या आणि लठ्ठपणा यांचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात 25 ते 30 वर्षे वयोगटातील व्यक्तीही हृदयविकाराने ग्रस्त आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी,
सध्या भारतात हृदयरुग्णांची संख्या 10 कोटींहून अधिक आहे. हृदयविकारामुळे जगात दरवर्षी दोन कोटींहून अधिक लोक आपला जीव गमावत आहेत.