Pranali Kodre
आयपीएलचा सध्या 16 वा हंगाम सुरू आहे.
आत्तापर्यंत या 16 हंगामांमध्ये मिळून हजारो खेळाडू खळले आहेत. पण, आत्तापर्यंत केवळ 7 असे खेळाडू आहेत, ज्यांनी 2008 पासून आत्तापर्यंतच्या सर्व 16 हंगामात खेळले आहेत.
विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, वृद्धिमान साहा, शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि मनिष पांडे या 7 खेळाडूंनी सर्व 16 आयपीएल हंगाम खेळले आहेत.
विराट हा एकमेव असा खेळाडू आहे जो 2008 पासून केवळ एकाच संघाकडून खेळत आहे. तो पहिल्या आयपीएल हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.
एमएस धोनीने आयपीएलमध्ये 16 हंगाम खेळताना चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 16 हंगाम खेळताना डेक्कन चार्जर आणि मुंबई इंडियन्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
वृद्धिमान साहाने आत्तापर्यंत 16 हंगाम खेळताना कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघांचे आत्तापर्यंत 16 हंगामात खेळताना प्रतिनिधित्व केले आहे.
दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
मनिष पांडेने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचे आत्तापर्यंत आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.