दैनिक गोमन्तक
थंडीचा ऋतू सुरू झाला की, घरातील लहान मुले, वडीलधारी मंडळीही आंघोळ करायला कधी कधी कचरतात.
कडाक्याच्या थंडीत लोकांना सकाळी लवकर आंघोळ करावीशी वाटत नाही. असे बरेच लोक आहेत जे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच अंघोळ करतात.
अनेकदा तुम्ही ऐकले असेल की रोज आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
पण, हिवाळ्यात रोज आंघोळ न केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
हिवाळ्यात तुम्ही रोज आंघोळ केली तर तुमची त्वचा ऍलर्जीची शिकार होऊ शकते. कारण त्यात गरजेपेक्षा जास्त ओलावा मिळू लागतो.
साधारणपणे हिवाळ्यात लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. जास्त वेळ गरम पाण्यात अंघोळ केल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होते. आपली त्वचा कोरडी होऊ लागते.
रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने नखांचे नुकसान होते. आंघोळ करताना, आपली नखे पाणी शोषून घेतात आणि नंतर ते मऊ होतात आणि तुटतात.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही थंडीत रोज आंघोळ केली तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते.
जर तुम्ही दररोज आंघोळ करत नसाल तर याद्वारे तुम्ही पाण्याची बचत करत आहात. एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या आंघोळीत दररोज 55 लिटर पाणी वाया जाते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपल्या त्वचेत चांगले बॅक्टेरिया तयार होतात जे शरीराला निरोगी ठेवतात आणि रासायनिक विषापासून संरक्षण करतात.
थंडीच्या मोसमात रोज आंघोळ करणं फायदेशीर नाही, हे जगभरातील त्वचा तज्ज्ञ मान्य करतात.