गोमन्तक डिजिटल टीम
गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित अग्निष्टोम महासोमयागाचा आजचा शेवटचा दिवस. पूर्णाहुतीने यज्ञ उत्सवाची सांगता झाली.
काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात विश्वशांतीसाठी अग्निष्टोम महासोमयागाचं आयोजन करण्यात आले होते.
पूर्णाहुती अगोदर अवभृथ स्नान (नदीकाठी स्नान) करण्यात आले.
सोमयागाचे यजमान सोमयाजी सुहोता दीपक आपटे आणि सुहोता समृद्धी दीक्षित आपटे या दांम्पत्यासह सहभागी ब्रह्मवृंदांनी नदीकाठी स्नान केले.
अवभृथस्नानानंतर पूर्णाहुती होऊन हा यज्ञ दुपारी तीन वाजता संपन्न झाला.