Manish Jadhav
भारतात लव्ह मॅरेजचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे, तर अरेंज्ड मॅरेजमध्ये घट होत आहे. द नॉट वर्ल्डवाइड या भारतीय उपकंपनी वेडिंगवायर इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
भारतात प्रेमविवाहाला अधिकाधिक मंजूरी मिळत आहे. 2020 मध्ये ब्रँडने केलेल्या शेवटच्या सर्वेक्षणात, 68 टक्के जोडप्यांनी त्यांचे लग्न ठरवले असल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार 41 टक्के जोडप्यांनी त्यांच्या लग्नाची योजना 4-6 महिने आधीच सुरु केली, त्यानंतर 32 टक्के जोडपी केवळ 1-3 महिने आधीच लग्नाची योजना आखतात.
2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे, विवाह नोंदणी प्लॅटफॉर्मचा वापर 11 टक्क्यांनी वाढला आहे.
भारताने जगात होणाऱ्या बदलांचा स्वीकार केला आहे. शहरांमध्ये लव्ह मॅरेजचा ट्रेंड वाढला आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही अरेंज मॅरेजला अधिक प्राधान्य देतात.
आधुनिक काळात लव्ह मॅरेजचं नवं फॅड निर्माण झालं आहे. विशेषत: शहरांमध्ये याची क्रेझ भलतीच वाढली आहे. तरुण-तरुणींचा वाढता कल पाहता लव्ह मॅरेजला पसंत केलं जात आहे.
शहरांसह आता ग्रामीण भागातही प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत चाललं आहे.
खरंच! प्रेमाची आणि आणि नात्याची नवी सुरुवात यामधून होते.