Akshay Nirmale
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ लवासा येथे पंतप्रधान मोदींचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याचे अनावरण होणार असल्याचे बोलले जात आहे.
यापुर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या नेत्रदीपक निकालाने खूश होऊन सुरतचे ज्वेलर बसंत बोहरा यांनी 156 ग्रॅम वजनाची पीएम मोदींची सोन्याची मूर्ती बनवली होती. त्या मूर्तीची किंमत 11 लाख रुपये आहे.
याआधी अहमदाबाद आणि इंदोर येथील व्यावसायिकांनीही पीएम मोदींच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्याचवेळी, मेरठमध्ये यावर्षी सराफा व्यापाऱ्यांनी प्रदर्शनात पीएम मोदींचे चित्र असलेली सोन्याची नाणी सादर केली.
मोदींच्या या पुतळ्याची उंची 190 ते 200 मीटर इतकी असणार आहे. म्हणजेच हा पुतळा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल. गुजरातमधील सरदार पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीपेक्षाही या पुतळ्याची उंची जास्त असणार आहे.
मोदींच्या पुतळ्याच्या अनावरणाला इस्रायल, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि युएसए चे प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
लवासामध्ये डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DPIL) पंतप्रधान मोदींचा पुतळा उभारणार आहे. DPIL चे अध्यक्ष अजय हरिनाथ सिंह यांनी
पुतळा परिसरात संग्रहालय, स्मारक उद्यान, मनोरंजन केंद्र आणि एक प्रदर्शन हॉलही असेल. प्रदर्शन हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि कर्तृत्वाची झलक पाहायला मिळणार आहे.