Akshata Chhatre
गोव्याचं इतिहास म्हटलं की केवळ किनारे, किल्ले आणि चर्चेस नव्हे तर मसाल्यांचाही गंध दरवळतो. प्राचीन काळी याच मसाल्यांच्या सुगंधाने युरोपियन व्यापारी गोव्यात खेचले गेले.
स्वयंपाक आणि आरोग्य यांचा मिलाफ म्हणजे लवंग. भात, मांसाहारी डिश आणि गरम चहा यामध्ये लवंगचा वापर सामान्य आहेच, पण दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठीही ती ओळखली जाते.
ताऱ्याच्या आकाराचा हा मसाला म्हणजे गोमंतकीय मसाला मिश्रणात एक खास स्थान मिळवलेला घटक. त्याची साखरकट लायसरीस चव पारंपरिक ग्रेव्हीत वेगळाच रंग भरते.
सुगंधित झाडाच्या सालीपासून मिळणारी तिकी म्हणजे गोव्याच्या पदार्थांना साजेसा उबदार सुगंध देणारा मसाला. त्याची पाने भात, आमटी व मसाल्याच्या पदार्थांमध्ये खास वापरली जातात.
पोर्तुगीजांनी गोव्यात आणलेलं मिरसांग (मिरची) आज इतकं रुळलेलं आहे की त्याशिवाय गोव्याच्या करी, लोणचं आणि सुकटाचं कालवण अपूर्ण वाटावं.
कोरडी कोथिंबीर म्हणजे फक्त मसालाच नव्हे, तर औषधी गुणधर्मांनी भरलेलं घटक. त्यापासून तयार केलेली काढी शरीरासाठी उपयुक्त मानली जाते.
हिरवी आणि काळी वेलची दोन्ही प्रकार गोव्यातील गोड आणि सणासुदीच्या पदार्थात वापरली जातात. सुगंध आणि गहिरा स्वाद यासाठी अत्यंत उपयुक्त.