Manish Jadhav
टेस्ला (Tesla) कंपनीने युरोपियन बाजारात आपली सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही 'Model Y Standard' चा स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केला.
मागील वर्षापासून युरोपमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीतील घट आणि वाढती स्पर्धा पाहता, टेस्लाने मागणी पुन्हा वाढवण्याच्या उद्देशाने हा स्वस्त व्हेरिएंट बाजारात आणला आहे.
जर्मनीमध्ये Model Y Standard ची किंमत 39,990 युरो (सुमारे ₹४६ लाख) ठेवण्यात आली आहे, जी पूर्वीच्या सर्वात स्वस्त Model Y पेक्षा सुमारे 5,000 युरो (सुमारे ₹४.६ लाख) कमी आहे.
टेस्लाने किंमत कमी केली असली तरी, युरोपियन आणि चिनी कंपन्या आधीच 35,000 युरोपेक्षा कमी किमतीत अनेक छोटे इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात आणत आहेत.
किंमत कमी करण्यासाठी टेस्लाने या व्हेरिएंटमधील काही फीचर्स कमी केले आहेत. यात कमी इंटिरियर लाइटिंग, कमी स्पीकर्स, फॅब्रिक सीट कव्हर्स आणि ऑटोस्टिअर (Autosteer) फीचरचा अभाव आहे.
नॉर्वेमध्ये या कारची किंमत सुमारे 41.7 लाख रुपये, तर स्वीडनमध्ये सुमारे 52.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
जर्मनी, नॉर्वे आणि स्वीडन या प्रमुख युरोपियन बाजारपेठांमध्ये ही कार नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत उपलब्ध होईल.
नॉर्वेमध्ये Model Y च्या डिलिव्हरीमध्ये चांगली वाढ झाली असली तरी, युरोपमधील अनेक देशांमध्ये यावर्षी टेस्लाच्या एकूण विक्रीत घट नोंदवली गेली आहे.