'नदाल अन् फेडरर' म्हणेज खेळाच्या दुनियेतील अनोख्या मैत्रीचं उदाहरण

Pranali Kodre

मैत्री

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर यांच्यात घट्ट मैत्री आहे.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

दिग्गज

खरंतर हे दोन्ही खेळाडू दिग्गज मानले जातात.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

कट्टर प्रतिस्पर्धी

विशेष म्हणजे टेनिसच्या कोर्टवर एकमेकांचे ते दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. कोर्टवर असताना एकमेकांना पराभूत करण्यासाठी ते जीवाची बाजी लावताना दिसले.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

कोर्टबाहेर मैत्री

दरम्यान, टेनिस कोर्टवर जरी ते अनेक वर्षे एकमेकांविरुद्ध लढले तरी गेल्या दोन दशकात टेनिस कोर्टबाहेर मात्र दोघांची घट्ट मैत्री झाली.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

अन् मैत्रीचं नातं घट्ट झाला

एकमेकांविरुद्ध खेळता खेळता ते मित्र म्हणून जवळ आले. अनेकदा ते आता एकमेकांचे कौतुकही करताना दिसतात.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

निवृत्तीवेळी दिसली मैत्री

पण, या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे दिसलं ते फेडररच्या निवृत्तीवेळी.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

फेडररची निवृत्ती

लंडनला 2022 मध्ये झालेल्या लेव्हर कप स्पर्धेनंतर फेडररने निवृत्ती घेतली. या स्पर्धेत नदाल आणि फेडरर एकत्र दुहेरी सामनाही खेळले.

Roger Federer Rafael Nadal

तो क्षण...

याच स्पर्धेत फेडरर निवृत्त झाल्यानंतर त्याच्या शेजारी बसून नदालही ढसाढसा त्याचा हात पकडून रडला होता. यावेळीचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.

Roger Federer - Rafael Nadal | Twitter

मैत्रीचं उदाहरण

त्यांची ही मैत्री खेळाच्या दुनेयेत मैदानात प्रतिस्पर्धी असले, तरी मैदानाबाहेर मैत्री होऊ शकते, हे दाखवून देणारे एक उत्तम उदाहरण ठरले.

Roger Federer Rafael Nadal | Twitter
Roger Federer and Rafael Nadal | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी